top of page

Pune : बोअरमध्ये पाणी किती? पुणेकरांच्या अनोख्या स्टार्टअप मध्ये बोअरवेलच्या तळाचा ठाव घेणारे संशोधन

Published on : 26 May 2023 at 2:25 pm




पुणे - शेती, पिण्यासाठी पाणी, व्यावसायिक कामे याच्यासह विविध कामांसाठी आपल्या देशात मोठ्याप्रमाणात बोअरवेलचा वापर केला जातो. बोअरवेल बंदिस्त असल्याने त्याची जलक्षमता किती आहे, हे कळणे कठीण असते. त्यामुळे बोअरवेल कोरडे होईपर्यंत सतत पंपिंग करून पाणी उपसले जाते. तसे झाल्याने पाण्याचे व्यवस्थापन करणे काहीसे मुश्‍कील होऊन जाते.


बोअरवेलचा वापर करीत असलेल्यांची हीच समस्या लक्ष करीत पुण्यात एका अनोख्या स्टार्टअपची स्थापना करण्यात आली आहे. भूजल पातळीबाबतचे अज्ञान आणि बोअरवेलचे अकार्यक्षम व्यवस्थापन, यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर योग्यप्रकारे होत नाही. वॉटरलॅब सोल्यूशन्स (Waterlab Solutions) या स्टार्टअपने ही आव्हाने समजून घेते,


त्यावर उपाय शोधला आहे. देशातील बोअरवेलच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी यंत्र विकसित करण्याच्या उद्देशाने गेल्या ३३ वर्षांपासून पाणी या विषयात कार्यरत असलेले विजय गावडे यांनी २०१९ मध्ये वॉटरलॅबची स्थापना केली. वॉटरलॅबने पहिले भूजल बोअरवेल मॉनिटरिंग अॅप तयार केले आहे. जे व्यक्ती, समुदाय, व्यावसायिक आणि संस्थात्मक वापरकर्त्यांसाठी सहजपणे उपलब्ध केले आहे. वॉटरलॅबला केंद्र सरकारच्या कृषी आणि बोरमध्ये पाणी किती आहे हे समजले तर त्याचा वापर कसा करायचा हे समजते.




उन्हाळ्यात हे नियोजन महत्त्वाचे ठरते. देशातील काही भाग असे आहेत की जेथे उन्हाळ्यात जनावरांसाठीदेखील पाणी नसते. अशा ठिकाणी हे नियोजन महत्त्वाचे ठरते. धरणांमधील पाण्याचे नियोजन ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, आपण आपल्याकडे असलेल्या पाण्याचे नियोजन कसे करायचे यावर मी संशोधन केले. त्यातून लक्षात आले की त्यासाठीचे माध्यम उपलब्ध नाही. त्यासाठी स्टार्टअपची स्थापना केली.’’




- विजय गावडे, संस्थापक, वॉटरलॅब सोल्यूशन्स

0 views0 comments

Waterlab Solutions Private Limited

Office Address:

WaterLab Solutions Pvt Ltd,
F.No. 308, B-1, Nandan Acura, 
Behind National Insurance Academy, Balewadi, Pune - 411045, India

  • alt.text.label.LinkedIn
  • alt.text.label.Instagram
  • Facebook

Bhujal is a registered trademark of Waterlab Solutions Pvt. Ltd

©2023 by Waterlab Solutions. All rights reserved 

bottom of page